Saturday, February 20, 2010

माती, पाणी आणि ऊर्जा संवर्धन कार्यशाळा संपन्न

अहमदपूर: दि. 28-01-10 - हैद्राबाद येथील नॅशनल कौन्सिल ऑफ रूरल इन्स्टीट्युट आणि येथील ग्रामीण विकास लोक संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने नुकतेच अहमदपूर येथे " पाणी,माती आणि ऊर्जा संवर्धन बाबतचे सुक्ष्म नियोजन - कार्यशाळा " संपन्न झाली.

या महत्वपूर्ण कार्यशाळेचे उदघाटन अहमदपूर चे नगराध्यक्ष श्री भारतजी चामे यांनी केले , याप्रसंगी अध्यक्षस्थानी यशस्वी ठरलेल्या केकतसिंदगी पाणलोट कार्यक्रमाचे प्रेरणास्थान श्री विठल चंदावार हे होते. कार्यशाळेचा उद्देश आणि भावी वाटचाल यानुषंगाने ग्रामीण विकास लोक संस्थेचे अध्यक्ष श्री मच्छींद्र गोजमे यांनी कार्यशाळेच्या प्रारंभी प्रास्ताविक केले.

पाणी, माती आणि ऊर्जा व्यवस्थापण व संवर्धन याबाबतचे नियोजन प्रत्यक्ष शेतकरी आणि महिला यांनी करावे आणि स्वंयसेवी संस्थानी या कामी सहाय्यक व मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी या उद्देशाने हैद्राबाद येथील नॅशनल कौन्सिल ऑफ रूरल इन्स्टीट्युट आणि येथील ग्रामीण विकास लोक संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने नुकतेच अहमदपूर येथे " पाणी, माती आणि ऊर्जा संवर्धन बाबतचे सुक्ष्म नियोजन - कार्यशाळेचे " आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत पाणी, माती आणि ऊर्जा यांचे व्यवस्थापण व संवर्धन याची गरज, उपचारपद्दती, प्रत्यक्ष नियोजन आणि नियोजनातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि स्वंयसेवी संस्थाची भूमिका यानुषंगाने सर्वश्री लातूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चे प्रकल्प अधिकारी श्री गुलाबसिंग राठोड, एन सी आर आय, (हैद्राबाद) चे प्रकल्प अधिकारी श्री आर एस रामाराव, अफार्म, (पुणे) चे श्री. पी एस सोळंके , कॄषी महाविद्यालय, (लातूर) चे प्रा. बडगिरे बी. बी, व प्रा. श्री व्ही. जी टाकाणखार,सेंद्रीय शेती अभ्यासक चंद्रकांत कातळे, लातूर जि. प. चे कॄषी अधिकारी श्री. व्ही. व्ही. भरगंडे, अहमदपूर तालुका कॄषी अधिकारी श्री विजयकुमार पाटील, इ. नामवंत विद्वान आणि अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी अहमदपूर तालुक्याती दिडशेहून अधिक शेतकरी आणि महिला यांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधि मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी शेतकरी आणि कार्यकर्त्यानी आपले मनोगत व्यक्त करून भविष्यात हा कार्यक्रम आपापल्या परिसरात यशस्वीरित्या कार्यवाहीत आणण्याचा निर्धार व्यक्त करून संगठीतपणे प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.यापसंगी संस्थेचे सचिव श्री नरसिंग घोडके यांनी सर्व पाहुणे, मार्गदर्शक आणि सहभागीतांचे आभार व्यक्त केले. कार्यशाळा उत्तमरित्या यशस्वी करणे कामी संस्थेचे कार्यकर्ते सर्वश्री बालाजी सावते, सुर्यकांत राठोड, माणिक राठोड, विजय शिंदे, राजकुमार शिंदे, नंदकुमार गोजमे, सुभाष मोठेराव, मधुकर कांबळे, राजेश्वर जोगदंडे आणि उषाताई गोजमे, मंगला श्रीमंगले, सुमन सावते इ. नी अथक परिश्रम घेतले.
- मच्छींद्र गोजमे